1 Kings 1:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सादोक, नाथान, बनाया आणि राजाचे सेवक यांनी राजा दावीदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया हे करेथी व पलेथी ह्यांना बरोबर घेऊन खाली गेले आणि शलमोनाला दावीद राजाच्या खेचरावर बसवून गीहोन येथे घेऊन गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी व पलेथी हे खाली गेले आणि शलोमोनला दावीद राजाच्या खेचरावर बसविले आणि त्याला गीहोन येथे नेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सादोक याजक, नाथान भविष्यवादी, यहोयादाचा पुत्र बनाया आणि राजाचे सेवक करेथी व पलेथी यांनी खाली जाउन राजा दाविदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दाविदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले.