1 Kings 1:47 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजाचा सेवकवर्ग दावीदाचे अभिनंदन करत आहे. ते म्हणत आहेत, ‘राजा दावीद थोर आहे. शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे. देव शलमोनाला दावीदापेक्षाही कीर्तिवंत करो. त्याच्या राज्याची दावीदापेक्षाही भरभराट होवो.’ दावीद राजा तेथे जातीने हजर होता. पलंगावरच तो वाकून अभिवादन करत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपला स्वामीराजा दावीद ह्याच्याकडे येऊन राजसेवक आशीर्वाद देत आहेत की, ‘आपला देव शलमोनाचे नाव आपल्या नावाहून श्रेष्ठ करो व त्याच्या गादीचा महिमा आपल्या गादीहून वाढवो.’ तेव्हा राजाने पलंगावरून नमन केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच, राजकीय अधिकारी येऊन दावीद आपल्या स्वामींना असे म्हणत आशीर्वाद देत आहेत, ‘आपला परमेश्वर तुमच्या नावांपेक्षा शलोमोनचे नाव अधिक प्रसिद्ध करो आणि त्याचे राजासन तुमच्या राजासनापेक्षा मोठे करो!’ आणि राजाने आपल्या पलंगावरून नमन केले
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजाचा सेवकवर्ग स्वामी दावीद राजाला आशीर्वाद देत आहे. ते म्हणत आहेत, राजा दावीद थोर आहे. शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे देव शलमोनाचे नाव तुमच्यापेक्षाही कीर्तिवंत करो. त्याचे राजासन तुझ्या राजासनापेक्षाही थोर होवो. तेव्हा पलंगावरूनच वाकून राजा अभिवादन करत होता.