1 Kings 1:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अदोनीया हा दावीद आणि त्यांची पत्नी हग्गीथ यांचा मुलगा. गर्वाने फुगून जाऊन त्याने स्वत : राजा व्हायचे ठरवले. राजा व्हायच्या प्रबळ इच्छेने त्याने स्वत:साठी एक रथ, घोडे आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे तयार केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या समयी हग्गीथेचा पुत्र अदोनीया शिरजोर होऊन म्हणाला, “मी राजा होणार.” त्याने रथ, स्वार व आपल्यापुढे धावण्यासाठी पन्नास पुरुष ठेवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावेळी अदोनियाह, ज्याच्या आईचे नाव हग्गीथ होते, त्याने स्वतःला पुढे करीत म्हटले, “मी राजा होणार.” म्हणून त्याने रथ आणि घोडे तयार केले आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे घेतली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा हग्गीथ्थेचा पुत्र अदोनीया स्वत:ला उंच करून म्हणाला, “मी राजा होईन.” त्याने स्वत:समोर रथ, घोडे तयार केले आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे ठेवली.