1 Kings 1:51 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोणीतरी शलमोनाला सांगितले, ‘अदोनीया तुमच्या धास्तीने पवित्र मंडपात वेदीची शिंगे धरुन बसला आहे. तो तिथून हलायला तयार नाही. ‘शलमोन राजाने मला अभय द्यावे’ असे तो म्हणत आहे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोनाला कोणी जाऊन सांगितले की, “अदोनीयाला शलमोन राजाची दहशत वाटते आहे; पाहा, तो वेदीची शिंगे धरून राहिला आहे; तो म्हणत आहे की, आपल्या दासाला तलवारीने वधणार नाही अशी आणभाक शलमोनाने आज करावी.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शलोमोनला सांगण्यात आले, “अदोनियाह शलोमोन राजाला घाबरत आहे आणि वेदीच्या शिंगांना धरून ठेवले आहे. तो म्हणतो की, ‘शलोमोन राजाने आज माझ्याशी शपथ घ्यावी की तो त्याच्या सेवकाला तलवारीने मारणार नाही.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणीतरी शलमोनाला सांगितले, “अदोनीया तुमच्या धास्तीने पवित्र मंडपात वेदीची शिंगे धरुन बसला आहे. तो तिथून हलायला तयार नाही शलमोन राजाने मला तलवारीने मारणार नाही याचे अभिवचन द्यावे असे तो म्हणत आहे.”