1 Kings 1:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एकदा एन - रोगेलजवळ रोहेलेथ खडकापाशी अदोनीयाने मेढरे, गुरे, पुष्ट वासरे यांचा शांत्यर्पण म्हणून यज्ञ केला. आपले भाऊ, राजाची इतर मुले आणि यहूदातील सर्व अधिकारी यांना बोलावणे पाठवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अदोनीयाने एन-रोगेलजवळचा जोहेलेथ खडक येथे मेंढे, बैल व पुष्ट पशू ह्यांचा यज्ञ केला आणि आपले बंधू सर्व राजकुमार व राजाचे सर्व यहूदी सेवक ह्यांना आमंत्रण केले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अदोनियाहने एन-रोगेलजवळ जोहेलेथच्या दगडावर मेंढरे, गुरे आणि पुष्ट वासरे यांचा यज्ञ केला. त्याने आपले सर्व भाऊ, राजपुत्र आणि यहूदीयाच्या सर्व राजकीय अधिकार्यांना आमंत्रित केले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एन-रोगेलजवळ जोहेलेथ खडकापाशी अदोनीयाने मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे कापले व आपले भाऊ, राजाची मुले आणि यहूदातील सर्व लोकांस, जे राजाचे चाकर होते त्यांना बोलावले.