1 Kings 10:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला जे रीतीप्रमाणे भेटीदाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारुन तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजम्यासाहित मायदेशी निघून गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोनाने राजाला अनुरूप अशा औदार्याने जे तिला दिले त्याशिवाय आणखी तिने जे जे मागितले ते ते सगळे तिला देऊन तिची इच्छा पुरवली. मग ती आपल्या परिवारासह स्वदेशी परत गेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शबाच्या राणीने शलोमोन राजाकडून ज्या गोष्टींची इच्छा केली व जे काही तिने मागितले ते सर्व राजाने तिला दिल्या, त्या शिवाय राजाच्या खजिन्यातूनही राजाने तिला भेटी दिल्या. मग ती तिच्या सेवकांसह आपल्या देशास परत गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला, जे रीतीप्रमाणे भेटीदाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारुन तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजम्यासाहित मायदेशी निघून गेली.