1 Kings 11:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
1मिद्यानहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हा सगळा जथा मिसरला गेला. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्रवस्त्राची सोय केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते मिद्यानातून जाऊन पारानास आले आणि पारानातून काही लोक बरोबर घेऊन मिसर देशाला फारो राजाकडे गेले; फारोने त्यांना राहायला घर दिले, त्यांच्या खाण्यापिण्याची तरतूद केली व त्यांना काही जमीनही दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते मिद्यान येथून निघून पारानकडे आले. मग पारानातून त्यांच्याबरोबर लोकांना घेऊन पुढे इजिप्तला, इजिप्तचा राजा फारोह याच्याकडे गेले, राजाने हदादला घर व जमीन व अन्नपुरवठा केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिद्यानाहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हे सगळे लोक मिळून मिसरला गेले. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्नवस्त्राची सोय केली.