1 Kings 12:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे अर्थातच लोकांच्या मनासारखे नव्हते. परमेश्वरानेच हे घडवून आणले होते. नबाटाचा मुलगा यराबाम याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने हे केले. शिलो येथील संदेष्टा अहिया याच्यामार्फत परमेश्वराने हे वचन दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे राजाने लोकांचे ऐकले नाही; ह्याचे कारण हेच की जे वचन परमेश्वराने शिलोकर अहीया ह्याच्या द्वारे नबाटाचा पुत्र यराबाम ह्याला दिले होते ते पूर्ण व्हावे अशी परमेश्वराची योजना होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे याहवेहने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या प्रकारे राजाने इस्राएल लोकांचे ऐकले नव्हते. परमेश्वरानेच हे घडवून आणले होते. नबाटाचा पुत्र यराबाम याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने हे केले. शिलो येथील संदेष्टा अहीया याच्यामार्फत परमेश्वराने हे वचन दिले.