1 Kings 12:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रहबाम यरुशलेमला परतला. यहूदा आणि बन्यामीन यांच्या वंशातील सर्वांना त्याने एकत्र केले. एकंदर एकलक्ष ऐंशी हजाराचे सैन्य जमले. इस्राएल लोकांशी लढून आपले राज्य परत मिळवायचा रहबामचा विचार होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरुशलेमेस आल्यावर रहबामाने यहूदाचे सर्व घराणे व बन्यामिनाचा वंश ह्यांतून एकंदर एक लाख ऐंशी हजार निवडक योद्धे जमा केले; इस्राएल घराण्याशी लढाई करून शलमोनाचा पुत्र रहबाम ह्याच्या हाती राज्य परत यावे असा हेतू होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील सर्व लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करून शलोमोनचा पुत्र रेहोबोअमसाठी राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रहबाम यरूशलेमेला परतला. यहूदा आणि बन्यामीन यांच्या वंशातील सर्वांना त्याने एकत्र केले. एकंदर एक लक्ष ऐंशी हजाराचे सैन्य जमले. इस्राएल लोकांशी लढून शलमोनाचे राज्य परत मिळवायचा रहबामाचा विचार होता.