1 Kings 13:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेथेल नगरात एक वृध्द संदेष्टा राहात होता. त्याच्या मुलांनी त्याला या संदेष्ट्याने बेथेल मध्ये काय केले ते येऊन सांगितले. यराबामला तो संदेष्टा काय म्हणाला तेही त्यांनी सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेथेल येथे त्या काळात एक वृद्ध संदेष्टा राहत असे; त्याच्या मुलांनी येऊन देवाच्या माणसाने त्या दिवशी बेथेलात जे काही केले त्याची सगळी हकिकत आपल्या बापाला कळवली; राजाला जे शब्द तो बोलला तेही त्याच्या मुलांनी आपल्या बापाला सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा बेथेलमध्ये एक वृद्ध संदेष्टा राहत होता, त्याच्या मुलांनी येऊन त्याला परमेश्वराच्या मनुष्याने त्या दिवशी जे केले ते सर्वकाही सांगितले. आणि तो राजाला जे काही बोलला ते देखील सांगितले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेथेल नगरात एक वृध्द देवाचा मनुष्य राहत होता. त्याच्या मुलांनी त्यास या संदेष्ट्याने बेथेल मध्ये काय केले ते येऊन सांगितले. राजाला तो संदेष्टा काय म्हणाला तेही त्यांनी सांगितले.