1 Kings 13:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यावर तो वृध्द संदेष्टा म्हणाला, “मीही तुझ्याप्रमाणेच एक संदेष्टा आहे.” आणी पुढे त्याने खोटेच सांगितले, “मला नुकतेच परमेश्वराच्या दूताचे दर्शन झाले. त्याने तुला माझ्या घरी घेऊन यायला आणि खाऊपिऊ घालायला मला सांगितले आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो त्याला म्हणाला, “मीही तुझ्यासारखाच संदेष्टा आहे; परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला म्हणाला, ‘त्याला परत आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे तो अन्नपाणी सेवन करील.”’ पण हे त्याचे सांगणे खोटे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या वृद्ध संदेष्ट्याने उत्तर दिले, “जसा तू तसाच मीही संदेष्टा आहे, आणि याहवेहच्या वचनाने दूत मला म्हणाला: ‘त्याने भाकर खावी व पाणी प्यावे म्हणून त्याला परत तुझ्या घरी घेऊन ये.’ ” (परंतु तो त्याच्याशी खोटे बोलत होता.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावर तो वृध्द संदेष्टा म्हणाला, “मीही तुझ्याप्रमाणेच एक संदेष्टा आहे.” आणि पुढे त्याने खोटे सांगितले, “मला नुकतेच परमेश्वराच्या दूताचे दर्शन झाले. त्याने तुला माझ्या घरी घेऊन यायला आणि खाऊपिऊ घालायला मला सांगितले आहे.”