1 Kings 13:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती त्याप्रमाणे तो म्हणाला, “हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे. ‘दावीदाच्या कुळात योशीया नावाचा मुलगा जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आत्ता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या आज्ञेवरून त्याने त्या वेदीविरुद्ध हे शब्द उच्चारले: “हे वेदी, हे वेदी, परमेश्वर म्हणतो, पाहा, दाविदाच्या घराण्यात योशीया नावाचा एक पुत्र जन्मेल; जे उच्च स्थानांचे याजक तुझ्यावर होमहवन करतात त्यांचा तो तुझ्यावर यज्ञ करील, मानवांच्या अस्थी तुझ्यावर जाळील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या वचनानुसार तो वेदीविरुद्ध ओरडला: “वेदी, हे वेदी! याहवेह असे म्हणतात: ‘दावीदाच्या घराण्यात योशीयाह नावाचा पुत्र जन्माला येईल. जे याजक तुझ्यावर येथे यज्ञ करतात, त्यांचे यज्ञ तो तुझ्यावर करेल, मनुष्यांची हाडे तुझ्यावर जाळली जातील.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तो म्हणाला, “हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे दाविदाच्या कुळात योशीया नावाचा पुत्र जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.”