1 Kings 13:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वृध्द संदेष्ट्याने या देवाच्या माणसाला फसवन आणले होते. तेव्हा हे सर्व ऐकून तो म्हणाला, “असा हा देवाचा माणूस. त्याने परमेश्वराचे म्हणणे ऐकले नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्याला मारायला सिंहाची योजना केली. असे होणार असे परमेश्वराने सांगितले होते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला वाटेवरून परत आणणार्या त्या संदेष्ट्याने हे ऐकले तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वराच्या तोंडचे वचन अवमानणारा देवाचा माणूस तो हाच, म्हणूनच परमेश्वराने त्याला सिंहाच्या स्वाधीन केले आणि परमेश्वराने त्याला सांगितलेल्या वचनाप्रमाणे सिंहाने त्याला फाडून ठार केले असावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याला त्याच्या प्रवासातून माघारी आणलेल्या त्या संदेष्ट्याने त्याविषयी ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वराचा मनुष्य, ज्याने याहवेहच्या वचनाचा अवमान केला तो हाच. याहवेहने त्याला सिंहाच्या स्वाधीन केले व त्याने त्याला फाडून मारून टाकले, याहवेहने त्याला चेतवणी दिल्यानुसार ते घडले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वृध्द संदेष्ट्याने या देवाच्या मनुष्यास फसवून आणले होते. तेव्हा हे सर्व ऐकून तो म्हणाला, “असा हा देवाचा मनुष्य. त्याने परमेश्वराचे म्हणणे अवमानले नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्यास मारायला सिंहाच्या स्वाधीन केले असावे. असे होणार हे परमेश्वराने सांगितले होते.”