1 Kings 14:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. आगीत गवताची काहीही शिल्लक राहात नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ उच्छेद करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव, पाहा, मी यराबामाच्या घराण्यावर अरिष्ट आणीन, यराबामाच्या घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाचा मी उच्छेद करीन, मग तो इस्राएलाच्या बंदीत असो की मोकळा असो; ज्याप्रमाणे शेण अगदी साफ निघून जाईपर्यंत काढून टाकतात त्याप्रमाणे मी यराबामाचे घराणे काढून टाकीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘यामुळे यरोबोअमच्या घरावर मी अरिष्ट आणणार आहे. मी इस्राएलातून यरोबोअमच्या घराण्याचा प्रत्येक शेवटचा पुरुष नष्ट करेन; मग तो गुलाम असो वा मोकळा असो. यरोबोअमचे घराणे संपूर्णपणे नष्ट होईपर्यंत शेणाप्रमाणे जाळून टाकीन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. मग तो इस्राएलात बंदीत असो की मोकळा जसे आगीत शेण काहीही शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ नाश करीन.