1 Kings 14:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात याआधी जे लोक राहात असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलच्या लोकांना दिला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्या देशात पुरुषगामीही होते; ज्या सर्व राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएलासमोरून हाकून दिले होते त्यांच्या अमंगळ कर्मांप्रमाणे हे करू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावेळी देशात मंदिरामध्ये पुरुषगामीही होती; जे सर्व याहवेहने इस्राएलातून काढून टाकले होते, त्या सर्वप्रकारच्या अमंगळ कृत्यांमध्ये लोक भाग घेत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही पुरुष वेश्या त्या देशात होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात यापूर्वी जे लोक राहत असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलाच्या लोकांस दिला होता.