1 Kings 14:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामची बायको ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती दाराजवळ येत असताना तिच्या पावलांचा आवाज ऐकून अहीया तिला म्हणाला, “हे यराबामाच्या पत्नी, आत ये; आपण दुसरीच कोणी आहोत असे सोंग तू का करतेस? तुला काही दुःखाचा संदेश सांगणे मला प्राप्त झाले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा अहीयाहने दाराजवळ तिच्या पावलांचा आवाज ऐकला, तेव्हा तो म्हणाला, “यरोबोअमचे पत्नी, आत ये. हे सोंग तू का घ्यावे? दुःखाची बातमी घेऊन मला तुझ्याकडे पाठविले गेले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामाची पत्नी ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे.