1 Kings 15:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेनहदाद हा तब्रिम्मोनचा मुलगा आणि तब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या मंदिराच्या व राजवाड्याच्या भांडारात सोने व चांदी राहिली होती ती सर्व काढून आसाने आपल्या सेवकांच्या हाती दिली व त्यांना दिमिष्कवासी अरामाचा राजा बेन-हदाद बिन टब्रिम्मोन बिन हेज्योन ह्याच्याकडे पाठवले; त्याने त्याला असे सांगून पाठवले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील भांडारात उरलेले सर्व चांदी व सोने काढून घेतले व ते आपल्या सरदारांच्या हाती स्वाधीन करून त्यांना हेजीओनचा पुत्र ताब्रिम्मनचा पुत्र बेन-हदाद, अरामचा राजा जो दिमिष्कात राज्य करीत होता त्याच्याकडे पाठवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामाचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेन-हदाद हा टब्रिम्मोनचा पुत्र आणि टब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती.