1 Kings 15:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजा बेनहदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल - बेथ माका, गालिल सरेवरालगतची गावे आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य पाठवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आसा राजाचे हे बोलणे मान्य करून बेन-हदादाने आपल्या सेनांच्या सरदारांना इस्राएली नगरांवर स्वारी करायला पाठवले; त्यांनी ईयोन, दान, आबेल-बेथ-माका, सगळा किन्नेरोथ व नफतालीचा सर्व प्रदेश जिंकला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेन-हदद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठविले. त्याने इय्योन, दान, आबेल-बेथ-माकाह आणि नफतालीसहीत संपूर्ण किन्नेरेथवर विजय मिळविला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा बेन-हदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल-बेथ-माका, गालिल सरोवरालगतची गावे, किन्नेरोथ आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य इस्राएलावर पाठवले.