1 Kings 15:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामग्री आणली. बन्यामीनमधील मेबा आणि मिस्पा येथे हे सर्व सामान त्यांनी वाहून नेले. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आसा राजाने यहूदातील सर्व लोकांना जाहीर केले, कोणाला सोडले नाही; बाशाने जे पाषाण व लाकडे लावून रामाची मजबुती केली होती ती सर्व त्या लोकांनी काढून नेली आणि आसा राजाने बन्यामिनाचा गिबा व मिस्पा ह्यांची मजबुती करण्याच्या कामी ती लावली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग आसा राजाने सर्व यहूदीयात एक हुकूम जाहीर केला; त्यातून कोणीही वगळले नाही; आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने बिन्यामीनातील गेबा आणि मिस्पाह हे बांधले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले. एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामग्री आणली. बन्यामीनमधील गिबा आणि मिस्पा येथे या सर्व वस्तू त्यांनी वाहून नेल्या. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.