1 Kings 15:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाशा हा अहीयाचा मुलगा. हे इस्साखारच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्याविरुद्ध इस्साखार घराण्यातील अहीयाचा पुत्र बाशा ह्याने फितुरी केली; बाशाने त्याला पलिष्ट्यांचे गिब्बथोन येथे ठार मारले; नादाब व सर्व इस्राएल ह्यांनी त्या वेळी गिब्बथोनास वेढा घातला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्साखार गोत्रातील अहीयाहचा पुत्र बाशाने नादाबाविरुद्ध कट केला, नादाब व सर्व इस्राएली लोकांनी गिब्बथोनला वेढा घातला असता, त्याने त्याला पलिष्ट्यांच्या गिब्बथोन नगरात मारून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाशा हा अहीयाचा पुत्र. हे इस्साखाराच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले.