1 Kings 15:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया याच्यामार्फन परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा होताच त्याने यराबामाच्या सर्व घराण्याचा संहार केला; त्याने यराबामाच्या कुळातील सर्वांचा नाश केला. त्यांतील एकही प्राणी जिवंत ठेवला नाही. परमेश्वराने आपला सेवक शिलोकर अहीया ह्याच्या द्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे सर्व झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या राज्याच्या सुरुवातीलाच, त्याने यरोबोअमच्या संपूर्ण घराण्याला मारून टाकले, याहवेहचा सेवक शिलोनी अहीयाहच्या वचनानुसार त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही, सर्वांचा नाश केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामाच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया यांच्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले.