1 Kings 15:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याखातर त्याने अबीयाला यरुशलेमचे राज्य दिले. परमेश्वराच्या कृपेने त्याला मुलगाही झाला यरुशलेमला परमेश्वर दयेने सुरक्षितताही लाभली. हे सर्व दावीदासाठीच परमेश्वराने केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि दाविदाकरता त्याचा देव परमेश्वर ह्याने त्याचा दीप यरुशलेमेत कायम राहू दिला; त्याच्या पश्चात् त्याच्या पुत्राची त्याने स्थापना केली; आणि यरुशलेम नगर सुस्थितीत ठेवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीपण दावीदाप्रित्यर्थ याहवेह त्याचे परमेश्वर यांनी त्याला त्याचा वारस म्हणून यरुशलेमात त्याला दीप दिला व यरुशलेमास बलवान बनविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दाविदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याच्याखातर त्याने त्याचा दीप यरूशलेमेत कायम राहू दिला. त्यानंतर त्याच्या पुत्राला उभारले, व यरूशलेम सुरक्षित ठेवले.