1 Kings 16:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाशा आणि त्याचा मुलगा एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वत: पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ती केल्यामुळे परमेश्वराचा कोप झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाशाची सर्व पातके व त्याचा पुत्र एला ह्याचीही सर्व पातके जी त्यांनी स्वतः केली व इस्राएलाकडून करवून त्यांना व्यर्थ गोष्टींच्या नादी लावून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संताप आणला त्यामुळे असे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण बाशाने व त्याचा पुत्र एलाहनी जी पापे केली आणि इस्राएली लोकांना देखील ती पापे करावयाला भाग पाडले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाशा आणि त्याचा पुत्र एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वत: पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ती केल्यामुळे इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध झाला.