1 Kings 16:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवसा राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाचा राजा आसा ह्याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी जिम्री हा तिरसा येथे राज्य करू लागला; त्याने तिरसात सात दिवस राज्य केले. ह्या वेळी लोक पलिष्ट्यांच्या ताब्यातल्या गिब्बथोन नगराजवळ ठाणे देऊन राहिले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी जिम्रीने तिरजाह येथे इस्राएलवर सात दिवस राज्य केले. सैन्याने पलिष्ट्यांच्या हद्दीतील गिब्बथोन नगराजवळ छावणी दिली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलाचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवस राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलाच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते.