1 Kings 16:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशेराच्या पूजेसाठी स्तंभ उभारला. आपल्या आधींच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहाबाने अशेरा मूर्तीची स्थापना केली. त्याने इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संताप आणण्याजोगी कामे आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या इस्राएलाच्या सर्व राजांहून अधिक केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहाबाने अशेरा देवीचे स्तंभही उभारले आणि असे करून त्याच्या आधी होऊन गेलेल्या राजांपेक्षा याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या क्रोधाला अधिक भडकाविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशेराच्या पूजेसाठी अहाबाने स्तंभ उभारला. आपल्या आधीच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला.