1 Kings 16:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा मुलगा अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा मुलगा सगूब हा वारला. नूनचा मुलगा यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या कारकिर्दीत बेथेलकर हिएल ह्याने यरीहो नगर पुन्हा वसवले. त्याने त्याचा पाया घातला तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र अबीराम मरण पावला; आणि त्याने त्याच्या वेशी उभारल्या तेव्हा त्याचा कनिष्ठ पुत्र सगूब मरण पावला; परमेश्वराने नूनाचा पुत्र यहोशवा ह्याच्या द्वारे सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहाबाच्या काळात, बेथेलचा हिएल याने यरीहोची पुनर्बांधणी केली. त्याने त्याचा पाया घातला, तेव्हा त्याचा प्रथमपुत्र अबीराम मरण पावला आणि जेव्हा त्याची फाटके उभारली तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब मरण पावला; नूनाचा पुत्र यहोशुआच्या द्वारे याहवेहने सांगितलेल्या वचनानुसार हे सर्व घडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा पुत्र अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब हा वारला. नूनचा पुत्र यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले.