1 Kings 16:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा परमेश्वराने येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वराला फार संताप आला होता. आधी यराबामच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामच्या कुळाचा संहार केला म्हणूनही परमेश्वराचा कोप झाला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराचे वचन हनानीचा पुत्र येहू संदेष्टा ह्याच्या द्वारे बाशा व त्याचे घराणे ह्यांच्याविरुद्ध प्राप्त झाले; ह्याचे कारण हे की बाशाने यराबामाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून परमेश्वराला संताप आणला व त्याने नादाबास ठार मारले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे, हनानीचा पुत्र येहू संदेष्ट्याच्या द्वारे याहवेहचे जे वचन बाशा व त्याच्या घराण्याकडे आले, कारण त्याने याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले व त्याने केलेल्या कृत्यांमुळे याहवेहचा क्रोध भडकविला, त्यामुळे यरोबोअमच्या घराण्यासारखे त्याचे झाले; आणि त्याचा नाश झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा परमेश्वराने हनानीचा पुत्र येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वरास फार संताप आला होता. आधी यराबामाच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामाच्या कुळाचा संहार केला म्हणून परमेश्वराचा कोप झाला होता.