1 Kings 16:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जिम्री हा एला राजाचा अधिकाही होता. एलच्या एकूण रथांपैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा चाकर जिम्री, जो त्याच्या निम्म्या रथांवर अधिकारी होता, त्याने त्याच्याविरुद्ध फितुरी केली. एला तिरसा येथे असताना तिरसातल्या मंदिराचा त्याचा कारभारी अरसा ह्याच्या घरी दारू पिऊन तो मस्त झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जिम्री, जो त्याच्या अधिकार्‍यांपैकी एक होता, जो त्याच्या निम्म्या रथांचा सेनापती होता, त्याने त्याच्याविरुद्ध कट रचला. एलाह त्यावेळी तिरजाह येथे, राजवाड्याचा अधिकारी अरजाच्या तिरजाह येथील घरी मद्यधुंद झाला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जिम्री हा एला राजाचा अधिकारी होता. एलाच्या एकूण रथापैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता.