1 Kings 18:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता कर्मेल पर्वतावर समस्त इस्राएलींना जमायला सांग. बालच्या साडेचारशे संदेष्ट्यांनाही तेथे घेऊन ये. तसेच अशेरा देवीच्या चारशे संदेष्ट्यांनाही. ईजबेल राणीचा त्या संदेष्ट्यांना पाठिंबा आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता जासूद पाठव आणि सर्व इस्राएलास, बआलमूर्तींच्या साडेचारशे संदेष्ट्यांना आणि ईजबेलीच्या पंक्तीला जेवणार्या अशेरा मूर्तींच्या चारशे संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर माझ्यापुढे जमव.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता सर्व इस्राएली लोकांना माझ्यासमोर कर्मेल डोंगरावर बोलावून घे. आणि जे ईजबेलच्या मेजावर भोजन करतात असे बआलाचे चारशे पन्नास संदेष्टे व अशेराचे चारशे संदेष्टे, त्यांनाही बोलावून घे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता सर्व इस्राएलाला, बआलाच्या साडेचारशे संदेष्टे व तसेच अशेरा देवीच्या चारशे संदेष्ट्यांनाही. जे ईजबेल मेजावर जेवणारे यांना घेऊन कर्मेल पर्वतावर ये.”