1 Kings 18:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एलीया तेथे सर्वंसमोर आला आणि म्हणाला, “कोणाच्या मागे जायचे हे तुम्ही केव्हा ठरवणार? जर परमेश्वरच खरा देव असेल तर तुम्ही त्याला अनुसरायला हवे. पण बाल खरा देव असेल तर त्याला तुम्ही अनुसरा.” लोक यावर काहीच बोलले नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलीया सर्व लोकांच्या सन्निध येऊन म्हणाला, “तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलीयाह लोकांच्या समोर जाऊन म्हणाला, “दोन मतांमध्ये तुम्ही कुठवर डगमगत राहणार? जर याहवेह हेच परमेश्वर आहे तर त्यांचे अनुसरण करा; परंतु जर बआल परमेश्वर आहे तर त्याला अनुसरा.” परंतु लोक काही बोलले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा एलीया सर्व लोकांजवळ येऊन म्हणाला, “तुम्ही कोठवर आपले मन बदलत राहणार? जर परमेश्वर खरा देव असेल तर त्यास अनुसरा. पण बआल खरा देव असेल तर त्यास अनुसरा.” लोक यावर एका शब्दानेही त्यास उत्तर देऊ शकले नाही.