1 Kings 18:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते अंगात आल्यासारखे वागत राहिले. पण काहीही घडले नाही बालकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही. कारण ऐकणारेच कोणी नव्हते!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञसमयापर्यंत ते बडबडत राहिले पण काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुपार सरून गेली आणि संध्याकाळच्या यज्ञाच्या वेळेपर्यंत ते अजूनही वेड्यासारखे भविष्यवाणी करीत होते. परंतु काहीही प्रत्युत्तर आले नाही, कोणी काही बोलले नाही, कोणी लक्ष दिले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते भविष्य सांगत होते. पण काहीही घडले नाही बालाकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही. कारण ऐकणारेच कोणी नव्हते!