1 Kings 19:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणखी काही वेळाने तो देवदूत पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्याला स्पर्श केला आणि त्याला म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहाणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसर्‍यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ, हे खा; कारण तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहचा दूत परत दुसर्‍यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ आणि खा, कारण तुला फार लांबचा प्रवास करावयाचा आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणखी काही वेळाने तो परमेश्वराचे देवदूत दुसऱ्यांदा पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्यास स्पर्श केला आणि त्यास म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.”