1 Kings 2:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग बथशेबा राजा शलमोनाकडे गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करुन तो सिंहासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे सिंहासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बथशेबा अदोनीयाच्या वतीने शलमोन राजाकडे बोलायला गेली. राजा तिचे स्वागत करण्यासाठी उठला व तिला दंडवत घालून आपल्या सिंहासनावर जाऊन बसला; त्याने आपल्या आईसाठी एक आसन मांडायला सांगितले, व ती त्याच्या उजवीकडे बसली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा बथशेबा शलोमोन राजाकडे त्याच्याशी अदोनियाहसाठी बोलण्यास गेली, तिला पाहताच राजा तिला भेटण्यास उभा राहिला, त्याने तिच्यापुढे डोके लवविले. राजाच्या आईसाठी आसन मागविले आणि ती त्याच्या उजवीकडे बसली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग बथशेबा राजा शलमोनाकडे अदोनीयाच्या वतीने बोलण्यास गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करून तो राजासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे राजासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.