1 Kings 2:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन म्हणाला, “अदोनीयाला मी याची अद्दल घडवीन. त्याला आता प्राणाला मुकावे लागेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोन राजाने परमेश्वराची शपथ वाहून म्हटले, “अदोनीयाने ही जी मागणी केली आहे तिच्यामुळे त्याने आपल्या प्राणावर संकट आणले आहे, तसे न घडले तर परमेश्वर माझे तसेच, किंबहुना त्याहूनही अधिक अनिष्ट करो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शलोमोन राजाने याहवेहची शपथ घेतली: “अदोनियाहने ही जी विनंती केली आहे त्यासाठी त्याचा जीव देऊन त्याने किंमत मोजली नाही तर, परमेश्वर माझे पाहो आणि माझ्याशी अधिक कठोरपणे वागो!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन राजा म्हणाला, “अदोनीयाने ही मागणी करून आपल्या जीवावर संकट आणले आहे; तसे न घडले तर परमेश्वर तसेच त्यापेक्षा अधिक माझे करो.