1 Kings 2:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा देव परमेश्वर ह्याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ; त्याच्या मार्गांनी चाल; आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय व निर्बंध पाळ; म्हणजे जे काही तू करशील त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यशःप्राप्ती होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि याहवेह तुझे परमेश्वर काय म्हणतात त्याकडे लक्ष दे: मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे याहवेहच्या आज्ञांचे पालन कर आणि त्यांचे नियम आणि आज्ञा, त्यांचे निर्णय आणि निर्बंध पाळ. असे केल्याने जे काही तू करशील आणि जिथे कुठे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर त्याच्या मार्गाने जा, परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम, कराराचे आदेश, व निर्णय काटेकोरपणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यामध्ये यशस्वी होशील.