1 Kings 2:42 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा शलमोनाने त्याला बोलावून घेतले. शलमोन त्याला म्हणाला, ‘यरुशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला देवाची शपथ घेऊन सांगितले होते. तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील असे मी तुला बजावले होते. आणि तू त्याला कबूल झाला होतास. माझा शब्द पाळायचे तू मान्य केले होतेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा राजाने शिमीला बोलावून आणून म्हटले, “‘ज्या दिवशी तू येथून निघून कोठेही जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणाला मुकशील हे पक्के ध्यानात ठेव’ असे मी तुला परमेश्वराची शपथ घालून बजावून सांगितले होते ना? आणि तू मला असे म्हणाला होतास ना की, ‘जे मी आता ऐकले ते ठीक आहे?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले आणि त्याला म्हटले, “याहवेहसमोर तुझ्याकडून शपथ घेऊन तुला मी चेतावणी दिली नव्हती काय की, ‘तू यरुशलेम सोडून कुठेही जाशील त्या दिवशी खचितच तू मरशील’? त्यावेळी तू मला म्हणालास, ‘तुम्ही जे काही म्हणता ते बरे आहे, मी त्याप्रमाणे करेन.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले. शलमोन त्यास म्हणाला, “यरूशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला परमेश्वराची शपथ घेऊन सांगितले होते ना? तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील? आणि तू त्यास कबूल झाला होतास. तू म्हणतोस ते मान्य आहे.