1 Kings 2:44 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझे वडील दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस त्याबद्दल आता परमेश्वरच तुला शासन करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा शिमीला म्हणाला, “माझा बाप दावीद ह्याच्याशी जी दुष्टाई तू केली ती सर्व तुझ्या जिवाला ठाऊक आहे, तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे प्रतिफळ तुझ्या शिरी येईल असे करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुढे राजा शिमीला म्हणाला, “माझे पिता दावीदाशी तू किती चुकीचा वागला हे तुला तुझ्या मनात ठाऊक आहे. याहवेहच तुला तुझ्या चुकीचा मोबदला देतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग राजा शिमीस म्हणाला, “माझे वडिल दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस ते तुला माहीती आहेत तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे फळ तुझ्या माथी आनील.