1 Kings 2:46 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग राजाने बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाने यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला हुकूम केल्यावरून त्याने जाऊन त्याच्यावर हल्ला केला आणि तो प्राणाला मुकला. शलमोनाच्या हस्ते राज्याला बळकटी आली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला राजाने आज्ञा दिली आणि त्याने बाहेर जाऊन शिमीवर वार केला आणि तो मेला. आता शलोमोनच्या हातात राज्य प्रस्थापित झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग राजाने यहोयादाचा पुत्र बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.