1 Kings 2:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“गेराचा मुलगा शिमी झकडे आसपासच आहे हे लक्षात ठेव. तो बहूरीम मधल्या बन्यामीन वंशातला आहे. मी महनाइमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट उद्गार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्याला मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की मी त्याला ठार करणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच तुझ्या पदरी बन्यामिनी गेराचा पुत्र बहूरीमकर शिमी हा आहे; मी महनाइमाला जात होतो त्या दिवशी त्याने मला भारी शिव्याशाप दिले; पण तो माझ्या भेटीला यार्देनेजवळ आला, तेव्हा मी परमेश्वराच्या नामाने त्याच्याशी आणभाक केली की मी तुझ्यावर तलवार धरणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आणि बहूरीम येथील बिन्यामीन गेराचा पुत्र शिमी तुमच्यात आहे हे विसरू नकोस, मी महनाईमकडे जाताना त्या दिवशी ज्याने मला भयंकर शाप दिला होता. पण जेव्हा तो मला यार्देनकडे भेटण्यास आला, तेव्हा ‘मी तुला तलवारीने ठार मारणार नाही’ अशी याहवेहच्या नावाने मी त्याला शपथ दिली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गेराचा पुत्र शिमी तुझ्याजवळ आहे हे लक्षात ठेव, तो बहूरीम मधला बन्यामिनी आहे. मी महनाईमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट शापाचे उद्गगार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्यास मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की, मी तुला तलवारीने ठार करणार नाही.