1 Kings 20:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेन-हदाद अरामचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बतीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने आपली सारी सेना एकवट केली; त्याच्याबरोबर बत्तीस राजे, घोडे व रथ होते; त्यांसह तो गेला; आणि शोमरोनास वेढा घालून त्याच्याशी लढला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अरामचा राजा बेन-हदादाने आपले सैन्य एकत्र केले. त्याच्याबरोबर बत्तीस राजे आपआपले घोडे व रथ घेऊन त्यांनी शोमरोनला वेढा घालून त्यावर हल्ला केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेन-हदाद अरामाचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बत्तीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले.