1 Kings 20:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा बेन - हदादकडून दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या माणसांना काही राहणार नाही. असे झाले नाही तर देवाने माझे वाटोळे करावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेन-हदादाने परत असा निरोप पाठवला की, “शोमरोनाची धूळ माझ्याबरोबरच्या लोकांना एकेक पसा पुरली तर देव माझे तसेच, किंबहुना त्याहूनही अधिक करोत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा बेन-हदादने अहाबास आणखी एक संदेश पाठवला: “जर माझ्या माणसांसाठी शोमरोनात मूठभर माती जरी पुरेशी पडली तरी देव माझे तसे किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा बेन-हदादकडून अहाबाला दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या मनुष्यांना काही राहणार नाही. असे झाले नाहीतर देव माझे तसे करो व त्यापेक्षा अधिक करो.”