1 Kings 20:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजा बेन - हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या माणसांना चढाईचा व्यूह रचायला सांगितले. त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हा निरोप बेन-हदादास मिळाला त्या वेळी तो व इतर राजे डेर्यांमध्ये पीत बसले होते; तो आपल्या सैनिकांना म्हणाला, “व्यूह रचा.” तेव्हा त्यांनी नगरापुढे व्यूह रचला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेन-हदाद आणि इतर राजे आपल्या तंबूंमध्ये मद्य पीत असताना त्याने ही बातमी ऐकली आणि त्याने त्याच्या माणसांना आज्ञा दिली: “हल्ल्यासाठी तयारी करा.” म्हणून शहरावर हल्ला करण्यास त्यांनी तयारी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा बेन-हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या मनुष्यांना नगरापुढे चढाईचा व्यूह रचायला सांगितले. “त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.”