1 Kings 20:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजा बेन - हदादचे अधिकारी त्याला म्हणाले, “इस्राएलचे देव हे पर्वतराजीतले देव आहेत. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरामाच्या राजाचे सेवक त्याला म्हणाले, “त्यांचे देव पहाडी देव आहेत; म्हणूनच ते आमच्यावर प्रबळ झाले; तर आता सपाटीवर आपण त्यांच्याशी युद्ध करू म्हणजे आपण खातरीने त्यांच्यावर प्रबळ होऊ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दरम्यान, अरामाच्या राजाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला, “त्यांची दैवते, डोंगरावरील दैवते आहेत. म्हणून ते आपल्यासमोर अधिक प्रबळ ठरले. परंतु आपण त्यांच्याशी जर मैदानावर लढलो, तर आपण त्यांच्यावर प्रबळ ठरू.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरामाच्या राजाचे अधिकारी त्यास म्हणाले, “इस्राएलाचा देव हा पहाडावरील देव आहे. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू.