1 Kings 20:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एक देवाचा माणूस (संदेष्टा) इस्राएलच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करवणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा देवाच्या माणसाने इस्राएलाच्या राजाकडे जाऊन सांगितले, “परमेश्वर असे म्हणतो, ‘परमेश्वर हा पहाडी देव आहे, तळवटीचा देव नाही’ असे अरामी लोक म्हणाले आहेत, ह्यास्तव हा सर्व मोठा समुदाय मी तुझ्या हाती देतो; मग मी परमेश्वर आहे अशी तुम्हांला जाणीव होईल.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराचा एक मनुष्य आला आणि त्याने इस्राएलच्या राजाला सांगितले, “याहवेह असे म्हणतात: ‘कारण अरामी लोकांना वाटते की याहवेह डोंगरावरील दैवत आहे, तळवटीचा नाही, म्हणून मी हे मोठे सैन्य तुझ्या हाती देईन आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एक देवाचा मनुष्य (संदेष्टा) इस्राएलाच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.”