1 Kings 20:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या सर्वांनी मग भरडे कपडे घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलच्या राजाकडे आले. त्याला म्हणाले, “तुमचा दास बेनहदाद तुमच्याकडे ‘जीवदान मागत आहे.”‘ अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा भाऊच आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याप्रमाणे ते कंबरांना गोणपाट गुंडाळून व गळ्यांत दोर्या बांधून इस्राएलाच्या राजाकडे जाऊन म्हणाले, “आपला दास बेन-हदाद म्हणतो, मला जीवदान द्यावे.” राजा म्हणाला, “तो अजून जिवंत आहे काय? तो तर माझा बंधू आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा आपल्या कंबरेला गोणपाट नेसून व डोक्याला दोरी बांधून, ते इस्राएलच्या राजाकडे गेले व म्हणाले, “आपला सेवक बेन-हदाद म्हणतो: ‘कृपया मला जीवनदान द्यावे.’ ” राजाने म्हटले, “तो अजूनही जिवंत आहे काय? तो तर माझा भाऊ आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या सर्वांनी मग गोणताट घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलाच्या राजाकडे आले. त्यास म्हणाले, “तुमचा दास बेन-हदाद तुमच्याकडे जीवदान मागत आहे.” अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा बंधूच आहे.”