1 Kings 20:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेनहदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबने बेनहदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेनहदाद तुमचा भाऊच आहे.” अहाबने बेनहदादला “आपल्यासमोर बोलावून घेतले.” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबने त्याला आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हा शुभशकुन समजून त्यांनी त्याच्या मनात काय आहे ते समजण्यासाठी त्याचे शब्द चटकन झेलून म्हटले, “आपला बंधू बेन-हदाद!” राजा त्यांना म्हणाला, “जा, त्याला घेऊन या.” बेन-हदाद त्याच्याकडे आल्यावर त्याने त्याला आपल्या रथात घेतले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या माणसांनी हे चांगले चिन्ह असे समजून अहाबाचा शब्द चटकन पकडून ते म्हणाले, “होय, आपला भाऊ बेन-हदाद!” राजाने म्हटले, “जा आणि त्याला घेऊन या,” जेव्हा बेन-हदाद बाहेर आला, अहाबाने त्याला आपल्या रथात घेतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेन-हदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबाने बेन-हदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेन-हदाद तुमचा भाऊ जिवंत आहे” अहाब म्हणाल, “जा आणि त्यास आणा” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबाने त्यास आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले.