1 Kings 20:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेनहदाद अहाबला म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुझ्या वडीलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडीलांनी शोमरोन मध्ये बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील” अहाब त्यावर म्हणाला, “या कारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतिचा करार केला. मग राजा अहाबने राजा बेन-हदादला मुक्त केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेन-हदाद त्याला म्हणाला, “जी नगरे माझ्या बापाने आपल्या बापापासून घेतली ती मी परत देतो; माझ्या बापाने शोमरोनात पेठा वसवल्या तशाच आपणही दिमिष्कात आपल्या नावाच्या पेठा वसवा;” अहाब म्हणाला, “ह्या शर्तींवर तुला सोडून देतो,” त्याने बेन-हदादाशी करारमदार करून त्याला सोडून दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेन-हदाद म्हणाला, “माझ्या पित्याने जी शहरे आपल्या पित्याकडून घेतली ती सर्व मी आपणास परत करेन. माझ्या पित्याने जशा शोमरोनात वसविल्या तशाच बाजारपेठा आपण दिमिष्कात वसवा.” अहाब म्हणाला, “या करारावर मी तुला मोकळे करतो.” म्हणून त्याने त्याच्याशी करार केला व त्याला सोडून दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेन-हदाद अहाबाला म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडिलांनी शोमरोनात जशा बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील” अहाब त्यावर म्हणाला, “या करारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतीचा करार केला. मग राजा अहाबाने राजा बेन-हदादला मुक्त केले.