1 Kings 20:39 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्याला म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, “याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा पंचाहत्तर पौंड चांदीचा दंड भरावा लागेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा जवळून जात असताना त्याने त्याला हाक मारून म्हटले, “आपला सेवक रणभूमीवर गेला होता तेव्हा एक मनुष्य दुसर्‍या एका मनुष्याला घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘ह्या मनुष्याला सांभाळ; जर का हा नाहीसा झाला तर तुझा जीव त्याच्या जिवाचा मोबदला होईल, नाहीतर तुला शंभर रत्तल रुपे दंड होईल.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजा जवळून जात असता, संदेष्ट्याने त्याला हाक मारीत म्हटले, “आपला सेवक युद्धभूमीवर गेला असता, एक मनुष्य एका कैद्याला माझ्याकडे घेऊन आला व म्हणाला, ‘या माणसावर लक्ष ठेव, तो जर गायब झाला, तर त्याच्या जिवासाठी तुला आपला जीव द्यावा लागेल, नाहीतर त्याचा मोबदला म्हणून तुला चांदीचा एक तालांत भरावा लागेल.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्यास म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, ‘याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा शंभर रत्तल चांदीचा दंड भरावा लागेल.’