1 Kings 20:40 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो माणूस पळून गेला.” यावर इस्राएलचा राजा म्हणाला, “त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे. तेव्हा निकाल उघडच आहे. तो माणूस म्हणाला ते तू केले पाहिजेस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपला सेवक इकडे तिकडे कामात गुंतला असता तो निसटून गेला.” इस्राएलाच्या राजाने त्याला म्हटले, “तोच तुझा न्याय; तू आपल्याच तोंडाने निर्णय केलास.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपला सेवक इकडे तिकडे व्यस्त असताना, तो मनुष्य गायब झाला.” “आपली शिक्षा हीच असणार,” इस्राएलचा राजा म्हणाला. “तू आपल्याच मुखाने ती सांगितली आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो मनुष्य पळून गेला यावर इस्राएलाचा राजा म्हणाला, त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे.” तेव्हा निकाल उघडच आहे. “तो मनुष्य म्हणाला ते तू केले पाहिजेस.”