1 Kings 20:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा राजा अहाबने आपल्या देशातील सर्व वडीलधाऱ्या माणसांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, बेन - हदाद हा विघ्र आणत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोने - चांदी तसेच माझी बायका मुले मागितली. त्याला मी कबूल झालो. आणि आता त्याला सर्वच हवे आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा इस्राएलाचा राजा देशातील सर्व वडील जनांना बोलावून आणून म्हणाला, “पाहा, हा मनुष्य माझे कसे अनिष्ट करू पाहत आहे; माझ्या स्त्रिया, मुले, सोने व रुपे हस्तगत करण्यासाठी त्याने माझ्याकडे मनुष्य पाठवला तेव्हा मी नाही म्हटले नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा इस्राएलच्या राजाने देशातील वडील लोकांना बोलाविले व म्हटले, “पाहा हा मनुष्य कसा त्रास देऊ इच्छित आहे! त्याने जेव्हा माझ्या स्त्रिया आणि माझी लेकरे, माझी चांदी व सोने मागवून घेतली, मी त्याला नकार दिला नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा इस्राएलचा राजा अहाबाने आपल्या देशातील सर्व वडिलधाऱ्या मनुष्यांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, हा मनुष्य माझे कसे अनिष्ट करू पाहत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोनेचांदी तसेच माझी स्त्रिया पुत्रे मागितली. त्यास मी कबूल झालो. आणि आता त्यास सर्वच हवे आहे.”